नाशिक दुर्घटनेतील मृतांचा आकडा 25

 

नाशिक :  वृत्तसंस्था ।  झाकीर हुसेन रुग्णालयात  टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली होती. यामुळे रुग्णालयात पुरवठा सुरु असणाऱ्या ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि ऑक्सिजन अभावी 25 जणांचा मृत्यू झाला

 

.  ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळपास 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, जवळपास 30 ते 35 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचा दावा केला जातोय. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

 

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सखोल चौकशी होण्याची  गरज असल्याचे सांगितले आहे. ही दुर्घटना मनला वेदना देणारी  दुर्दैवी आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. तशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी आम्ही एक समिती नेमण्याचे आम्ही जाहीर करत आहोत. यामध्ये विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे अध्यक्ष असतील. ही समिती एकूण सात जणांची असेल. .

 

मला येथील प्रशासनाने सांगितलं की येथे ऑक्सिजनची गळती झाली होती. त्यामुळे काहीही दिसत नव्हतं. मात्र, सगळे जीवावर उदार होऊन घटनास्थळी गेले. येथे लॉक तोडून ऑक्सिजनची गळती बंद करण्याचं काम करण्यात आलं. त्यानंतर उरलेलं 75 ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आलं. त्यानंतर  गॅसचा टँकची वेल्डींग करण्यात आली.

Protected Content