कोरोना : जिल्ह्यात आज दिवसभरात ११४२ बाधित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात आज दिवसभरात १ हजार १४२ रूग्ण बाधित आढळून आले आहे तर १ हजार १३४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जामनेर तालुक्यासह जळगाव शहरात संसर्ग वाढलेले दिसून येत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-१८९, जळगाव ग्रामीण-३९, भुसावळ ११४, अमळनेर-३५, चोपडा-१०५, पाचोरा-६६, भडगाव-०, धरणगाव-१८, यावल-२७, एरंडोल-६५, जामनेर-२८७, रावेर-१०४, पारोळा-३१, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-३८, बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकुण १ हजार १४२ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख १२ हजार ६७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९९ हजार ५५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ११८ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज अहवालात लक्षणिय बाब म्हणजे दिवसभरात एकुण २२ बाधितांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी ८ रूग्ण हे जळगाव शहरातील आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

Protected Content