संचारबंदी : मराठे गल्ली परिसरात मोफत अन्न धान्य वाटप

धरणगाव, प्रतिनिधी । येथे आज सकाळी मराठे गल्ली परिसरातील ज्या लोकांना काहीही सहारा नाही आहे ,असे गरजू लोकांना गहू , तांदूळ, तेल ,साखर , चहा पावडर , मिरची पावडर , हळद , साबण आदी वस्तु भूषण मराठे मित्रपरिवार तर्फे वाटप करण्यात आले.

देशात लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत जीवनावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद आहे. यामुळे गरीब व हातावर पोट असणाऱया नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू व गरीब नागरिकांना भूषण मराठे मित्रपरिवारातर्फे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पवन मराठे , गोपाल पाटील ,दिपक पाटील , मुकेश पाटील ,रोहन मराठे, पवन राजपूत ,रितेश फुलझाड़े , पवन लखन पाटील मित्रपरिवार उपस्थित होते.

Protected Content