नगराध्यक्ष परदेशी यांच्या हस्ते ‘ग्रीन आर्मी’ उपक्रमाचा शुभारंभ

3974fe31 1ff8 4d13 9cb8 a9a9ec06e820

एरंडोल (प्रतिनिधी) येथे गुरुकुल कॉलनीत संजीवन व्यसन मुक्ती केंद्राचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांची कन्या रोहिणी हिच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि.२३) लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते रोप लावून ‘ग्रीन आर्मी एरंडोल’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

 

या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, राजेंद्र शिंदे, अमोल जाधव, सैंदाणे, राकेश पाटील, राजू पाटील, देवरे, उपक्रमाचे प्रमुख कैलास महाजन, सुधीर शिरसाठ, डॉ. प्रशांत पाटील, पंकज महाजन, रोहिदास पाटील, राजू ठक्कर, गोकुळ पाटील, देवल राजपूत, गोरख वाणी, गोरख पाटील आदी वृक्षप्रेमी उपस्थित होते.

नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी सदर उपक्रमाला शुभेच्छा देत शहर हिरवेगार करण्यासाठी आपण नगरपालिकेतर्फे ‘ग्रीन आर्मी’ उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन दिले. आर.ए. शिंदे, रोहिदास पाटील यांची यावेळी समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक ‘ग्रीन आर्मी’ चे प्रमुख कैलास महाजन यांनी केले. सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन पंकज महाजन यांनी केले.

Protected Content