जामनेर येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी (व्हिडिओ)

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जामनेरात महाराणा प्रताप यांची जयंती महाराणा चौक व नगरपालिका चौक येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

आज आपण वेगवेगळे समाज हे जो तो जाती धर्माचा अनुसार महापुरुषांना वाटून घेतो व ठराविक समाजाच त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजरा करतो असे न करता आपण सर्वांनी एकत्र येऊन महापुरुषांच्या जयंत्या साजरी करावी, कारण महापुरुषांनी सर्व समाजासाठी समावेशक असतांना काम केलेला आहे. त्यामुळे समाज बांधवांनी महापुरुषाला वाटून घेऊ नये, त्याचबरोबर शहरांमध्ये महाराणा प्रताप यांचा मोठा पुतळा उभारणार असल्याची माहिती कार्यक्रमात बोलताना आमदार गिरीश महाजन यांनी केले.

यावेळी प्रतिमापूजन आमदार गिरीश महाजन व संजय दादा गरुड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, जि. प. सदस्य पती जेके चव्हाण, भाजपा गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, नगरसेवक अतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, नाजिम पार्टी, नवल राजपूत, राष्ट्रवादी नेते संजय गरुड, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, काॅग्रेसचे शंकर राजपूत, रतन सिंग परदेशी, डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. बाजीराव पाटील, भगवान सोनवणे, आर.एस. पाटील, जालम सिंग राजपूत, दीपक तायडे, नाजिम पार्टी यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!