खा. राणा विरुद्ध शिवसेना पुन्हा आक्रमक

रुग्णालय प्रशासन  मेटाकुटीला :  षड्यंत्र समोर यायलाच हवे- राणा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –  खा. नवनीत राणा यांच्यावर रुग्णालयात होत असलेल्या उपचाराचे व्हिडीओ शुटींग समोर आले आहे. यावरून शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी रुग्णालय प्रशासनास धारेवर धरले आहे.

तुरूंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर रूग्णालयात त्यांच्या एमआरआयसह विविध तपासण्या होत असताना झालेली व्हिडीओ शुटींग समोर आल्यानंतर यावरून शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास विविध प्रश्न ऊपस्थित केले असून नवनीत राणा यांचा एमआरआय खरोखरच झाला आहे का?, एमआरआय करताना व्हीडीओ शुटींग, फोटो कोणत्या आधारे काढले गेले? रुग्णालयाचे नियम सर्वांना समान असावे, या तपासण्यांचा अहवाल मिळेपर्यंत रुग्णालयातून जाणार नसल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे यांच्यासह अन्य शिवसेनेचे पदाधिकाऱ्यानी म्हटले आहे.

जे षडयंत्र रचण्यात आले, ते माध्यमांमध्ये यायला हवे

खा. नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.  गेल्या तीन दिवसापासून खा. नवनीत राणा यांच्यावर उपचार झाले आहेत. ते सर्व जनतेपर्यंत पोहचलं आहे. खा. नवनीत राणा यांच्या एमआरआयसह विविध तपासण्यावरच खा. राणा  नाटक करीत असल्याचा आरोप शिवसेना करीत आहे. यावरून आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुले आव्हान दिले आहे.  ज्यांना हे नाटक सुरु आहे असे वाटत असेल तर त्यांनी सांताक्रुज लॉकअपमधील रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंतचा व्हिडीओ रिलीज करावा. आमच्यावर जो अन्याय झाला, मुख्यमंत्र्यांकडून जे षडयंत्र रचण्यात आले, ते माध्यमांमध्ये यायला हवे,  असे आ. रवी राणा यांनी यावर  म्हटले  आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!