एरंडोल शहराच्या विकासासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर

 

 

एरंडोल प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत विशेष रस्ता अनुदान व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आमदार चिमणराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून एरंडोल शहरासाठी अडीच कोटी निधी मंजूर करण्यात आला. याकामी महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य मिळाले.

एरंडोल शहरासाठी नुकताच रु. ४ कोटी एवढा निधी मंजूर केल्यानंतर पुन्हा शहराच्या मूलभूत गरजा व मुख्य समस्या विचारात घेऊन आमदार चिमणराव पाटील यांनी शहरातील विविध भागासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.या बद्दल बोलताना आमदार चिमणराव पाटील म्हणाले की यापुढे देखील एरंडोल शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यात येईल.विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. एरंडोल शहराच्या इतिहासात वर्षभरात सुमारे दहा कोटी रुपयांची कामे मंजूर करणारा एकमेव आमदार असल्याचे आपल्याला समाधान वाटते. लोकशाहीत जनता हीच केंद्रबिंदू समजून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. एरंडोल शहरातील नागरिकांनी भविष्यात नगरपालिकेवर शिवसेनेला एक हाती सत्ता दिल्यास सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून शहराचे स्मार्ट सिटीत रूपांतर करू असा मानस आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Protected Content