एरंडोल सरपंच संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्र पाटील निवड.

एरंडोल प्रतिनिधी | श्री. क्षेत्र पद्मालय येथे झालेल्या एरंडोल तालुका सरपंच संघटनेची बैठकीत तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील तर कल्याणी पाटील यांची महिलाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली

एरंडोल तालुका सरपंच संघटनेची बैठक श्री क्षेत्र पद्मालय येथे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजमल पाटील जामनेर तसेच बाळू धुमाळ, युवराज पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीत तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील यांची तर कल्याणी पाटील यांची महिलाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

सदर बैठकीत तालुका कार्यकारिणी ठरविण्यात आली यात गुलाब पाटील जळू, महेश पांडे कासोदा, विनोद पाटील हनुमंतखेडा, महेंद्र महाजन कोल्हापूर, कैलास सोनवणे पिंपरी, गोकुळ देशमुख रवंजे, दिनेश आमले जवखेडा, सुनील भिल आडगाव, उमेश पाटील, देशमुख राठोड आनंद नगर महिला कार्यकारणीत वैशाली पाटील धारागीर, प्रतिभा पाटील मालखेडा, शारदा पाटील उत्राण, आशाबाई पाटील भातखेडा, सायली पाटील खडके खुर्द, कोकिळा हटकर पिंपळकोठा, सुरेखा पाटील निपाने, सुनिता पाटील जवखेडे, गालापूरचे माजी सरपंच अरिप दादा, भागवत पाटील, विकास सोनवणे तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच आदींची उपस्थिती होती.

बैठकीचे आयोजन करणारे ताडे सरपंच सचिन पाटील व गालापूर चे सरपंच महेंद्र महाजन यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमास सदर निवडप्रसंगी सर्व सदस्य सरपंचांनी राजेंद्र पाटील व कल्याणी पाटील व सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन जळूचे सरपंच गुलाब पाटील यांनी केले

Protected Content