चुंचाळे येथील नविन विद्युत सबस्टेशन मागणीला उर्जामंत्र्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे गावाच्या परिसरात कृषी उद्योग व शेतकरी जिवंत राहण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांना नवीन सबस्टेशनच्या मागणीसाठी आमदार शिरीष चौधरी व जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री ना. डाँ नितीन राऊत यांच्या हस्ते  रावेर तालुका येथे सावखेडा बु  येथे नवीन सबस्टेशन च्या भूमिपूजन कार्यक्रमा निमित्त रावेर तालुक्यातील दौऱ्यावर होते त्या वेळी  सावदा महावितरणच्या विभागा अंतर्गत येणाऱ्या यावल तालुक्यातील चुंचाळे गावासाठी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनियमित व अपुर्ण विद्युत समस्या आणी यातुन  निर्माण होणाऱ्या शेतीपिक उत्पादनाच्या अडचणी या दृष्टीकोणातुन शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता २०१७ पासून या परिसरासाठी सबस्टेशन मिळावे, प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविलेला होता.

परंतु अद्याप पर्यंत मजुरी मिळाली नाही म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री ना. नितिन राऊत यांना यावल रावेर आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वात पत्र दिले. या संदर्भात मंत्री महोदय यांना यावल तालुक्यातील बाजूच्या सबस्टेशन बाबत म्हणजे दहिगाव सबस्टेशन वर२९५ ट्रान्सफॉर्मर , साकळी सबस्टेशन वर३१७  ट्रान्सफॉर्मर व किनगावं सबस्टेशन वर२६८ विद्युत क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर असल्याची माहिती उर्जामंत्री यांना देण्यात आली व चुंचाळे या गावातील क्षेत्राला सबस्टेशन नसल्याने वरील गावातील  तिघे सबस्टेशनमध्ये असल्यामुळे या सर्व सबस्टेशनचा विद्युत पुरवठ्याचा लोड कमी होऊन सर्व शेतकऱ्यांना सुरळीत व पूर्णक्षमतेच्या दाबाने वीजपुरवठा होईल, त्यामुळे आपण चुंचाळे सबस्टेशनला लवकर मान्यता द्यावी अशी विनंती या असंख्य शेतकरी बांधवांनी केली.

यावेळी मंत्री महोदयांनी सुद्धा तात्काळ आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या सोबत तात्काळ चर्चा करून शिफारस पत्र देण्याचे सांगून या सबस्टेशनच्या प्रस्तावास त्वरीत मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी परिसरातील शेतकरी यांच्या सोबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील व चुंचाळे, दहिगाव व परिसरातील दिले यावेळी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत व आमदार शिरीष चौधरी व शेखर पाटील यांचे आभार मानले .

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!