नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात दिल्लीत डेरा आंदोलन करणार; बच्चू कडूंचा इशारा

दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधातील तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी मोठ्याप्रमाणावर आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहणार असून दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असा इशारा ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील आता ‘चलो दिल्ली’चा नारा देत केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

“चलो दिल्ली…केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार.” असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विट केलं आहे.

Protected Content