गुरव समाज सामुदायिक मौंज व्रतबंधन सोहळा उत्साहात

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अखिल गुरव समाज संघटना बुलढाणा जिल्हा शाखा मेहकर श्री बल्लाळ देवी संस्थान अमडापूर तालुका चिखली यांच्या वतीने नुकताच सामुदायिक उपनयन व्रतबंधन मौज सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष महिला मनिषा विटकरे यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपालराव सोनटक्के जिल्हाध्यक्ष यांनी केले. मार्गदर्शन  विखुरलेला समाज एकत्र यावा, जिल्ह्यांमध्ये ठिकाने सामाजिक उपक्रम झाले पाहिजे व विद्यार्थी मित्रांना शिक्षण विषयावर मार्गदर्शन व आरोग्य शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम वधू-वर परिचय मेळावे असे विविध प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत. यानिमित्ताने सर्व समाज बांधव एकत्र येऊन विखुरलेला समाज एकजूट होऊन समाजाची उन्नती आणि प्रगती होईल असे विचार व्यक्त केले.

दिलीप पुसदकर यांनीसुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि जिल्ह्यामध्ये ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे समाजाची प्रगती होत समाज संघटित होऊन यासाठी मार्गदर्शन केले. वल्लभ राव देशमुख  यांनी सुध्दा बटुला शुभ आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या तर आभार प्रदर्शन दत्तात्रे वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष यांनी केली. जिल्ह्यातून बहुसंख्येने समाज बांधव महिला तसेच सर्व पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप कुमार पुसदकर त्याचप्रमाणे बल्लाळ देवी संस्थानचे अध्यक्ष वल्लभ राव देशमुख, पंचायत समिती माजी सदस्य प्रसाद राव देशमुख, मधु देशमुख, सचिव बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गोपालराव सोनटक्के, किरण महाराज, पुजारी विदर्भ संघटक दत्तात्रय वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष संजय विटकरे, मेहकर तालुका अध्यक्ष गोपाळराव दिडांळकर, वाशिम जिल्हाध्यक्ष मुकुंदराव विटकरे,  शहरप्रमुख उमेश विटकरे आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी संस्थानचे पुजारी संतोष महाराज, बाळूमामा जोशी आणि सतीश सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

Protected Content