पल्स पोलिओ मोहिमेत नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्राने दिलेल्या उद्दिष्टाच्या ९३.५८ टक्के पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

त्यांना नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विरेंद्र पाटील, वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय डॉ. चंद्रशेखर पाटील,लोहारा डॉ. अभिलाषा पाटील, सुपरव्हायझर दिपक दिक्षित, शिवाजी ब्राम्हणे, रमेश चौधरी, भारती साळुंखे, ज्योत्स्ना पाटील, आकाश ठाकूर, राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले. मोहिमेत नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्राने दिलेल्या उद्दीष्टाचे ९३.५८ टक्के काम करत प्रथम क्रमांक पटकावला तर वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ९३.३८ टक्के, लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ ८५.५६ टक्के काम झाले.

दि. २७ रोजी झालेल्या पल्स पोलिओ मोहिमेत लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्र ३ हजार ६६३ पैकी ३ हजार ३३८, लोहटार – ४ हजार ७७५ पैकी ४ हजार २४९, नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात – ४१४२ पैकी ३ हजार ९९३, नांद्रा – ३ हजार १७२ पैकी २ हजार ९४१, वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात – ६ हजार २५० पैकी ५ हजार ९७९ बालकांना लसीकरण करून २२ हजार १४२ दिलेल्या उद्दीष्टा पैकी २० हजार ४५० लसीकरण करून ९०.४६ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय मोबाईल टिमने ३०५ ट्रान्झिट टिम २९०, पाचोरा शहरात ९ हजार १७६ असे एकूण ३० हजार २२१ बालकांना लसीकरण करून सरासरी ९२.६३ टक्के काम पूर्ण झाले आहे. २१४ बुथवर ५७७ कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

 

 

 

Protected Content