कोरोना : जिल्ह्यात आज १९ बाधित आढळले; ९ तालुके निरंक !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशानाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यातून १९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५३ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. कालप्रमाणे आज देखील ९ तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-५, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ -०, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-२, धरणगाव -०,यावल -०, एरंडोल -०,जामनेर-१, रावेर ३ , पारोळा -०, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर -०, बोदवड -० असे एकुण १९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ३९५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ४५६ रूग्ण बरे होवून कोरोनामुक्त झाली आहे. तर जिल्ह्यात आज ३६६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तर आजच्या अहवालात जिल्ह्यातील ९ तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली. 

 

Protected Content