कृषि उत्पन्न बाजार समिती यावलतर्फे सांगवी येथे धान्य खरेदीस प्रारंभ

 

यावल, प्रतिनिधी। तालुक्यातील सांगवी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन शासनाच्या वतीने भरड धान्य खरेदी केन्द्राचे आज सोमवार २३ नोव्हेंबरपासुन आ. शिरीष चौधरी व आ. लता सोनवणे यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आले.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील सांगवी येथील विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थांच्या गोदामावर रावेर व आमदार शिरीष चौधरी व आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते शासन हमी भाव भरड धान्य केन्द्रांचे शुभारंभ करण्यात आला. याप्रंसगी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवी सोनवणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार( मुन्नाभाऊ ) पाटील , पंचायत समितीचे काँग्रेस गटनेता शेखर सोपान पाटील, तहसीलदार महेश पवार, कृउबाचे संचालक राकेश फेगडे, उमेश बेंडाळे, भानुदास चोपडे, सुनिल बारी , नितिन व्यंकट चौधरी, कॉग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, सेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, भाजपाचे डॉ. नरेन्द्र कोल्हे, बारसु रामदास नेहते, उल्हास निंबा चौधरी, खरेदी विक्री संघाचे संचालक नरेन्द्र नारखेडे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारीवृंद परिसरातील शेतकरी बांधव याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातुन सुमारे १०० शेतकऱ्यांची ज्वारी ऑनलाईनव्दारे सुमारे ३० हजार क्विंटल ज्वारीची खरेदीची नोंदणी करण्यात आल्याची माहीती कृउबाच्या सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे. शेतकऱ्यांचे धान्य हे कमी भावा पेक्षा शासनाच्या हमी भावाने शेतकरी बांधवांनी द्यावी असे आवाहन उपस्थितांच्या माध्यमातुन याप्रसंगी करण्यात आले.

Protected Content