महात्मा बसवेश्वर जयंती द्वीपंधरवाडा उत्सव रद्द ; घरोघरी जयंती साजरी करण्याचे आवाहन

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) कोरोना सारख्या महाभयंकर संकटामुळे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त द्वीपंधरवाडा उत्सव रद्द करण्यात आला आहे. तर जयंती घरोघरी साजरी करण्याचे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केले.

 

महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सवानिमित्त शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांची व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच चर्चा केली. अक्षयतृतीया २६ एप्रिलला एकाच वेळी सकाळी १० वाजता आपल्याला घरीच शिवा संघटनेचा रूमाल घालून सर्व परिवारास महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करावी. पुष्पहार घरी फुले उपलब्ध असल्यास तयार करा. पुष्पहार आणण्यासाठी बाहेर जाऊ नका, असे सांगण्यात आले. कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी लाॅकडाऊन असल्याने यावर्षीची २६ एप्रिल ते २६ मे या दरम्यानच येणारी ८८९ वी महात्मा बसवेश्वर जयंती द्वीपंधरवाडा उत्सव रद्द करण्यात आल्याचे घोषीत केले. तरी सर्व समाजबांधवांनी व शिवा संघटनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी यावर्षी महात्मा बसवेश्वर जयंती आपापल्या घरीच साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content