तब्बल १०० वर्षांनी बोहरा समाजाची मागणी झाली मान्य !

Yawal News यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बोहरा समाजाची मागणी तब्बल १०० वर्षांनी पूर्ण झाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, यावल शहरात मागील १०० वर्षापेक्षा अधिक काळा पासुन बोहरा समाज येथे रहिवास करून राहत आहे. तेव्हापासून समाजातर्फे कब्रस्थानला जागा मिळावी असे प्रयत्न करण्यात येत होते. बोहरा समाजच्या मयत व्याक्तिच्या दफनविधी करण्यासाठी हक्काचे कब्रस्तान नव्हते. समाजा बांधवांच्याच्या वतीने नगर परिषदकडे सातत्याने मागणीचा पाठपुरावा लावून ठेवला होता परंतु तांत्रिक अडचणींचे कारण पुढे सांगून आत्ता पर्यंत स्थानिक प्रशासनाच्या वतीने टाळाटाळ करण्यात येत होती .

दरम्यान, साधारण एक वर्षा पूर्वी या बोहरा समाजातील मान्यवरांनी यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील व कॉंग्रेस कमेटीचे यावल शहर अध्यक्ष कदीर खान यांच्या माध्यमातून भेट घेतली. त्यांनी समाजासाठी कब्रस्तानला कायम जागा मिळावी यासाठी विनंती केली. त्या विनंतीला मान देत अधिकार्‍यांना तात्काळ बोलावून माहिती घेतली. यानंतर तत्काली जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. त्या नुसार जिल्हाधिकारी कार्यालयातून चौकशी करून झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नगरपरिषला बोहरा समाज कब्रस्तान साठी १९ गुंठे जागा देण्या बाबतचे शासन आदेश नगरपरिषदेला दिले आहेत.

सदरील बोहरा समाज कब्रस्तानाची प्रशासन आदेशची प्रत समाजातील मान्यवरांना आमदार शिरीषदादा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्या वेळी समाजाच्या वतीने आभार सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी कॉंग्रेस समितीचे जेष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीर खान , प्रभाकर आप्पा सोनवणे , शेखर पाटील व कदिर पटेल उपस्थित होते.

Protected Content