इनरव्हील क्लबतर्फे वृक्षारोपणद्वारे श्रावण महिन्याचे स्वागत

चोपडा प्रतिनिधी । येथील इनरव्हिल क्लबतर्फे वृक्षारोपणाच्या माध्यमातून श्रावण महिन्याचे अतिशय चैतन्यदायी वातावरणात स्वागत करण्यात आले.

श्रावण महिना सुरू झाला असून अतिशय आल्हाददायक वातावरणात चोपडा येथील इनरव्हील क्लबच्या महिला भगिनी सदस्यांनी व नाव निर्वाचित पदाधिकारी यांनी श्रावणी स्वागतासाठी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ५० वृक्षांची लागवड केली. हतनूर कॉलनी परिसरात श्री अष्ट विनायक मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी क्लबच्या अध्यक्ष शैला सोमाणी, सचिव अंकिता जैन, माजी अध्यक्ष डॉ. कांचन टिल्लू, ज्येष्ठ सदस्य ज्योती वारके , सीसी सौ.किरण पालिवाल, मीना पोतदार, चेतना बडगुजर, सीमा पाटील,चंचल जैस्वाल,पारुल जैन आदि उपस्थित होते.

याप्रसंगी वृक्षारोपण व पर्यावरण शुद्धीकरण यामुळे मानवी आरोग्य निरामयी राहात असल्याने कोरोना संकट काळात ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते. त्याकरिता सर्वांना वृक्षांची निगा राखणे व वृक्षसंगोपन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ कांचन टिल्लू यांनी केले.

सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत उपस्थितांनी वृक्षारोपण केले. दरम्यान, हा परिसर व तेथील सार्वजनिक ठिकाणी ओपन स्पेस मध्ये वृक्षारोपण द्वारे परिसर विकासासाठी इनरव्हील क्लब आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी अध्यक्ष शैला सोमाणी व सचिव अंकिता जैन यांनी सांगितले.

Protected Content