क्वारंटाईन सेंटरमध्ये तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा प्रतिनिधी । तपासणीसाठी स्वॅब पाठविल्यानंतर क्वॉरंटाईन सेंटरमध्ये असणार्‍या युवकाने मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील बांबरूड राणीचे येथील रहिवासी असणारा विनोद रमेश कोकणे (वय३३) हा तरूण १९ जुलै रोजी पाचोरा शहरातील साईमोक्ष क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला होता. २० जुलै रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला असून अद्याप त्याचा रिपोर्ट आलेला नव्हता. या पार्श्‍वभूमिवर त्याने मध्यरात्रीच्या सुमारास क्वॉरंटाईन सेंटरमध्येच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती समोर येताच खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्‍वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे ,डॉ.अमित साळुंखे यांनी भेट देत पाहणी केली.

या युवकाच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, या युवकाने कोरोनाच्या धास्तीने की वैयक्तीक कारणांनी आत्महत्या केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content