फैजपूर येथे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | टिपू सुलतान यांच्या २७२ वी जयंती निमित्त उद्या दि २० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूल च्या प्रांगणावर विराट कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कुस्त्यांच्या विराट दंगलप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पीआरपीचे जगन सोनवणे, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, सावदा येथील डायमंड इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन हारून शेठ, फैजपूरचे माजी नगरसेवक शेख जफर, माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, माजी उपनगराध्यक्ष कलिम खान मण्यार, शेख इलियास सर, इंजिनिअर राजू तडवी, सैय्यद जाविद जनाब, पीआरपीचे शेख आरिफ,अफसर खान,आरिफ आझाद (मुक्ताईनगर),यावलचे माजी नगरसेवक शेख असलम, शेख हमीद,शेख इरफान (चिनावल), माजी उपनगराध्यक्ष रशिद तडवी, माजी नगरसेवक अप्पा चौधरी, माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे,काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनवर खाटीक, बिलाल शेख,असिफ मॅक्निकल, रईस मोमीन यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.या विराट कुस्त्यांचे आयोजन शेख अखतर पहेलवान,शेख वसीम जनाब, शेख फारूक अब्दुल्ला,आवेश भांजा यांनी केले असून यावेळी पंच म्हणून पहेलवान शेख नासिर हुसेन हाजी करीम,शेख शकील पहेलवान,उत्तम पहेलवान,सबदर पहेलवान हे पंच म्हणून काम पाहणार आहे.

Protected Content