विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे येणार जिल्हा दौर्‍यावर

जळगाव प्रतिनिधी। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. निलम गोर्‍हे या शुक्रवार, दि. ६ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत असून प्रशासनाने त्यांचा दौर्‍यातील कार्यक्रम जाहीर केला आहे.

डॉ. निलम गोर्‍हे या शुक्रवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे येणार आहेत. यानंतर साडे अकरा वाजता त्या शासकीय अधिकारी यांच्यासमवेत कोरोनामुक्त गावांचा आढावा घेणार आहेत. दुपारी १२.१५ ते १.०० वाजेपर्यंत कोरोना काळात सामान्य नागरीक, कामगार, शेतकरी, मजूर यांना मदत देण्यासाठी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या योजनांचा आढावा देखील डॉ. गोर्‍हे घेतील. यानंतर दुपारी एक वाजचा कृषीविभाग, कामगार विभाग, परिवहन विभाग, रोहयो व आदिवासी विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग विभागाची आढावा बैठक घेणार आहेत.

यानंतर दुपारी पावणेतीन वाजता डॉ. निलम गोर्‍हे या जळगाव शिवसेना पक्ष कार्यालय येथे कार्यकर्त्यासमवेत चर्चा व शिवसंपर्क मोहिमेचा आढावा घेणार आहेत. कार्यकर्त्यांशी जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांबाबत चर्चा देखील त्या करणार आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!