जिल्हा परिषदेत ९८ अनुकंपाधारकांची नियुक्तीची प्रतीक्षा संपली – संकेतस्थळावर होणार यादी जाहीर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी | जिल्हा परिषदेत अनुकंपाधारकांची नियुक्तीची प्रतीक्षा आज समाप्त झाली असून आज तब्बल ९८ जणांच्या नियुक्त्या समुपदेशनाने करण्यात आल्या आहेत. दरम्यान, डिसेंबर महिन्यात ७८ कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या होत्या.

 

जिल्हा परिषदेच्या अनुकंपाधारक उमेदवारांना मागील ८ ते १० वर्षांपासून प्रतिक्षा यादीत नाव येवून देखील नियुक्ती मिळालेली नव्हती. अशा उमेदवारांची नियुक्तीची प्रतिक्षा जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पुढाकार घेत तीन महिन्यात अनुंकपाचा प्रश्न मार्गी लावला आहे. मागील दोन महिन्यापुर्वी २५ परिचरांना देखील वर्ग चार मधून वर्ग तीन मध्ये कनिष्ठ क्लार्क पदावर बढती देण्यात आली आहे. या तीन महिन्यात जवळपास १८७ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आज छत्रपती शाहु महाराज सभागृहात ही भरती प्रक्रीया पार पडली .त्यात ९८कर्मचाऱ्यांच्या निंयुक्त्या देण्यात आल्या आहे. रात्री उशिरा संकेत स्थळावर या कर्मचाऱ्यांची नियुक्ती पत्रे व विभागाचे आदेश जारि होणार आहे. त्यामुळे आज जिल्हा परिषदेच्या आवारात अनुकंपाधारकांसह अन्य बढती पात्र उमेदवारांची गर्दी केलेली पहावयास मिळाली. प्रतिक्षा यादीतील ११० अनुकंपाधारकांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली होती.त्यातील ११ ते १२ अनुकंपाधारक हे अपात्र ठरले आहे.त्यातील ९८ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहे. निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये १४,ग्रामसेवक,३५ लिपीक,२९ शिपाई,कृषी,पशुसंवर्धन,औषध निर्मातासाठी १,लेखा विभागात २ कनिष्ठ लिपीक,२ वरिष्ठ लिपीक अशा नियुक्त्या देण्यात आल्या असल्याची माहीती उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे पवार यांनी दिंली आहे

Protected Content