पारोळयात उद्या पद्मावती देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पद्मावती मंदिरात विधीवत पूजन करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

पारोळा शहरात देवी पद्मावती मंदिराचे निर्माण झाले आहे. तेथे दिनांक तीन रोजी देवी पद्मावती प्राणप्रतिष्ठा विधीवत करून विराजमान होणार आहे. हा सोहळा दिनांक तीन ते पाच जानेवारी असे तीन दिवस सुरू राहणार आहे. तर, दिनांक सहा जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दक्षिणेकडील राज्य सोडली तर महाराष्ट्रात देवी पद्मावती चे मंदिर नसल्याचे जाणकारांचे मत आहे. या अनुषंगाने दक्षिणत्य शैली अनुसरून या मंदिराचे निर्माण केले आहे. गरुड स्तंभ, देवीचे दोन शुभ्र हत्ती त्याचप्रमाणे ३६ देव-देवतांच्या मुर्त्या या सर्व सुशोभित मंदिरावर विराजमान आहेत. दिनांक ३ रोजी शहरातील बालाजी मंदिर येथून मिरवणुकेद्वारे देवी पद्मावतीचे आगमन भवानी गड येथे होणार आहे. रात्री ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी या भव्य धार्मिक उपक्रमात भाविकांनी उपस्थिती द्यावी. असे आवाहन भवानी गडाचे मुख्य विश्वस्त डॉक्टर मंगेश तांबे यांनी केले आहे.

Protected Content