अनिल येवलेंचे प्रयत्न : रेल्वे भुयारी मार्गातील तुटलेल्या जाळीच्या प्रश्न सुटला

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील रेल्वे भुयारी मार्गातील चेंबरवरील तुटलेल्या जाळी प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, पाचोरा शहराला जोडणारा राजे छत्रपती संभाजी महाराज रेल्वे भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचु नये म्हणून उजव्या व डाव्या बाजूला चेंबर बनविण्यात आले असुन त्यावर लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. मात्र शहराकडुन महाराणा प्रताप चौकाकडे जातांना डाव्या बाजूस असलेल्या चेंबर वरील जाळी ही गेल्या चार दिवसांपासून तुटलेली होती. ही जाळी तुटलेली असल्याने याठिकाणी मोटरसायकलचे तसेच शाळकरी मुलांचे किरकोळ अपघात घडत असुन अनेक वृद्ध, बालक हे जखमी देखील झाले आहे. मात्र याकडे नगरपालिका प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले होते.

दरम्यान, ही तुटलेली जाळी तात्काळ बदलण्यात यावी अशी मागणी अनिल (आबा) येवले यांनी केली होती. त्याची दखल नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी त्वरित घेऊन इंजिनिअर सूर्यवंशी यांना सूचना दिल्या. या अनुषंगाने ठेकेदार संदीप राजे पाटील यांनी रेल्वे भुयारी मार्ग व नगरपालिका येथे त्वरित नवीन जाळी बसविली या त्वरित केलेल्या कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते अनिल (आबा) येवले यांनी न. पा. प्रशासनाचे आभार मानले आहे.

Protected Content