कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत घेण्याबाबत निवेदन

पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासन व न्यायालयाच्या आदेशानंतर महामंडळाचे नियमित चालक व वाहक कामगार लागल्यावर या सर्व कंत्राटी वाहक चालकांना एस.टी. महामंडळ व संबंधित कंत्राटदार कंपनीने दुर्लक्ष करीत त्यांची सेवा खंडित केली असल्याने कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घेण्यात यावे. या मागणीचे निवेदन आज दि. 6 सप्टेंबर 2022 रोजी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांना देण्यात आले आहे.

गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून व नंतरच्या काळात सुमारे ६ महिन्यापर्यंत चाललेल्या एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील परिवहन सेवा पूर्णपणे विस्कळीत होणार होती. अशा संघर्षमय काळात जळगाव विभागातील एकूण ११० कंत्राटी चालक, वाहका सह राज्यभरातील ८०० कंत्राटी चालक, वाहकांना सदर परिवहन सेवा सुरु ठेवून एस. टी. महामंडळास जीवदान दिले आहे. सदरच्या काळात एस.टी. कर्मचारी व जनतेमध्ये या विषयावर अतिशय प्रशंभक व संवेदनशील वातावरण होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राची ही रक्तवाहिनी मानली जाणारी लालपरी एस. टी. सुरू ठेवली. प्रसंगी जात जीवावर संकट दगड – गोटे झेलून महाराष्ट्रातील जनतेच्या लाडक्या लालपरीची चाके गतिमान ठेवली या संघर्षात काही चालक वाहकाचे रक्तही सांडले. अनेकांना जायबंदी व्हावे लागले.

सेवे दरम्यान कंत्राटी कंपनीशी ठरलेल्या करारा नुसार ठरलेला वेतनही फार मोठी तफावत दिसून येत आहे. कामा अतिरिक्त अति कालीन भत्ताही तवाफत दिसून आली. अतिशय कमी व अनियमित वेतनावर या सर्व निराशाची भावना दाटून आली आहे दि. ३ सप्टेंबर २०२२ रोजी वाहतूक विभागाने सर्व कंट्रातील चालक वाहकांना वापर पूर्णपणे बंद करण्याचा शासनादेश काढला आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. एस. टी महामंडळाच्या संकट काळात गरजेच्या वेळी सदर कर्मचाऱ्यांचा वापर करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.

वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे जळगाव विभागातील एकशे दहा व संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ८०० तरुण चालक वाहकांच्या मनातून निराशाची भावना निर्माण झाली. या भावनेचा प्रक्षोभ होऊन त्यातून काही विपरीत घडू नये म्हणून याबाबत योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. म्हणून जळगाव विभागातील ११० व राज्यातील ८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घेऊन उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

याप्रसंगी समाधान पाटील, समाधान पवार, हरिभाऊ पाटील, नरेंद्र पाटील, कमलसिंग चौधरी, बापु पवार, यशवंत खैरनार, प्रशांत पाटील, मच्छिंद्र कोळी, प्रविण वाघ, पंकज पाटील, ललित श्रावणे सह चालक व वाहक उपस्थित होते. रास्त मागणीच्या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून देण्यात येणार आहे.

Protected Content