राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या जळगाव युवा जिल्हाध्यक्षपदी शिशिर जावळे

 

भुसावळ (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार-प्रसार अभियानाचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांची राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष स्वामीराज राजेश्वर गिरीराज महाराज यांच्या आदेशान्वये या परिषदेचे राष्ट्रीय राष्ट्रीय महासचिव डॉक्टर पद्मनाभ गिरी महाराजांनी राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या जळगाव जिल्हा युवा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

 

राष्ट्रहित, जनहित आणि धर्म हित समोर ठेवून सेवा, संस्कार, सुरक्षा हे तीन गुण आत्मसात करून परोपकाराची कार्य यां माध्य मातुन करणार असल्याचे, तसेच मी पूर्ण प्रामाणिकपणे निष्ठेने, अंतकरणापासून या माध्यमातून संत सेवा समाजाची तन-मन-धनाने अविरत सेवा करणार असल्याच, शिशिर जावळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे या सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून संतांचा, धर्माचं व मानव जातीचं रक्षण करणे, त्यांना सुरक्षा प्रदान करणे, अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करणे, आदर्श समाजाची आणि भारताच्या निर्मितीसाठी या परिषदेच्या माध्यमातून संतांचा निरूपण संतांची शिकवण आणि संस्कार घराघरांमध्ये मना मनामध्ये जनतेपर्यंत पोहोचविणे, साधुसंतांवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराविरुद्ध लढा देणे, साधुसंतांना त्यांचा हक्क मिळवून देणे, विविध कथा कीर्तन प्रसंगांच्या आयोजन करणे, सामाजिक उपक्रम राबवणे, साधुसंतांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात पूर्ततेसाठी पाठपुरावा करणे, ही आणि अशी अनेक उद्दिष्टे राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेची आहेत. सदर राष्ट्रसंत परिषदेच्या जळगाव जिल्ह्यामध्ये शहर, गाव तिथे शाखा स्थापित करणा र असल्याचे व अधिक माहितीसाठी 9325147700 ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिशिरजावळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content