Home Cities अमळनेर अमळनेरातील शिवाजीनगरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

अमळनेरातील शिवाजीनगरात स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी


अमळनेर प्रतिनिधी । येथील शिवाजी नगर पैलाड परिसरात शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरा करण्यात आली. यावेळी युवा सेना उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी युवा सेना तालुका प्रमुख किशोर पाटील, युवा सेना शहर प्रमुख अमर पाटील, जिवन पवार, प्रताप शिंपी व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच आर्डी ता अमळनेर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत युवा सेना तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांच्या पॅनलला बहुमत मिळाल्याने त्यांचा विशेष सत्कार नगरसेवक प्रताप आबा शिंपी मित्र परिवारामार्फत करण्यात आला.


Protected Content

Play sound