‘प्लास्टिक द्या, पर्यावरण वाचवा ‘ – ‘इनरव्हील क्लबची जळगावकरांना हाक

जळगाव प्रतिनिधी | इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टने विधायक उपक्रम हाती घेतला असून टाकाऊ स्वरूपातील प्लास्टिक गोळा करून ते रिसायकल करणार आहेत. ‘इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून या अभियानात सहभागी व्हावे’ असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

घराघरात प्लास्टिक कचऱ्याची समस्या मोठे स्वरूप धारण करीत आहे. जळगाव शहरात प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत आहे. या समस्येमुळे प्रयावरण प्रदूषण देखील होत आहे. प्लास्टिक नष्ट होत नाही, त्यामुळे या प्लास्टिकचे करायचे काय हा प्रश्न प्रत्येकापुढे आहे. याला पर्याय म्हणून इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टने प्रजासत्ताक दिनापासून विधायक उपक्रम हाती घेतला आहे.

शहरातील टाकाऊ स्वरूपातील प्लास्टिक गोळा करून ते रिसायकल केले जाणार आहे. त्यामुळे पर्यावरण विकासासाठी व संवर्धनासाठी मदत होणार आहे. याकरिता नागरिकांनी इनरव्हील क्लबच्या पदाधिकार्यांशी संपर्क करून त्यांच्याकडे टाकाऊ प्लास्टिक जमा केले जाणार आहे. डिस्पोजेबल प्लास्टिकच्या पुनर्वापराबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहरात विविध ठिकाणी होर्डिंग लावण्यात आले आहेत. प्लास्टिक थैल्या, खाद्यपदार्थ्यांचे रॅपर, पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या आदी प्लास्टिक या अभियानात देता येणार आहे. ओले आणि दुर्गंधीयुक्त प्लास्टिक गोळा होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्लास्टिक रिसायकल मोहिमेसाठी विक्रम मुणोत, डॉ.मयुरी पवार, आकार नियोन यांचे सहकार्य आहे. या माध्यमातून कचरा वेचणाऱ्या व गरीब महिलांना रोजगार मिळेल या हेतूने काम दिले जाणार असून त्यासाठी अध्यक्ष नीता परमार (८००७७८०८९६, ९२२५१२१४३१), बबिता मंधान (९३७३५९६२६३) यांचेशी संपर्क साधावा. किंवा आकार नियोन, ३४, गणेशवाडी या पत्त्यावर महिन्याच्या पहिला आणि तिसऱ्या मंगळवारी प्लास्टिक द्यावे असे इनरव्हील क्लब ऑफ ईस्टच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Protected Content