जळगावात महाशिवरात्रीनिमित्त स्वर्णीम भारत आध्यात्मिक मेळाव्याचे भव्य आयोजन

shiv

जळगाव प्रतिनिधी । महाशिवरात्रीनिमित्त ब्रह्माकुमारीतर्फे स्वर्णीम भारत आध्यात्मिक मेळाव्याचे भव्य आयोजन ओंकारेश्वर मंदिर आवारात 19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले आहे.

ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री पावनपर्वा निमित्त जळगावकरांसाठी ऐतिहासिक आणि भव्य असा स्वर्णीम भारत आध्यात्मिक मेळा हा प्रथमच आयोजित केला जात आहे. जळगाव येथील सुप्रसिध्द ओंकारेश्वर मंदिराच्या समोर डॉ. सुधीर शहा यांच्या समोरील प्रांगणात सदरहू मेळावा असेल. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भगवान शिवाची 33 फुटी भव्य शिवलिंग होय. बारा ज्योर्तिलिंगांच्या भव्य प्रतिकृतीही याबरोबर असतील. त्याचे बरोबर आध्यात्मिक आणि मूल्यनिष्ठ खेळ अबालवृद्धांचे आकर्षण ठरणारे आहे. अत्याधुनिकल एलईडी वॅन मधील विविध अॅनिमेटेड आणि माहितीपूर्ण व्हिडिओ भाविकांच्या ज्ञान वृद्धीगत करतील. व्यसनमुक्ती, स्वच्छता, पर्यावरणाचा संदेशही याप्रसंगी दिला जाणार आहे. सदरहू मेळावा 19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान रोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुला असणार आहे.

शिवानी दिदींच्या कार्यक्रमाच्या चेअरपासेसचे वितरण
मेळाव्यास भेट देणा­या भाविकांना यानिमित्ताने सुवर्णसंधी आहे की, ब्रह्माकुमारी शिवानीदीदींच्या जळगाव येथील 8 मार्च, 2020 रोजी क्रीडा संकुल येथे होणाऱ्‍या कार्यक्रमांच्या पासेस मोफत वितरीत करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी केले आहे.

Protected Content