जागतिक एड्स दिनानिमित्त शहरातून काढली प्रभातफेरी

shivil hostpital news

जळगाव, प्रतिनिधी । येथील जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण केंद्रामार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित प्रभातफेरीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जे. सानप यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलगुरु पी.पी. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव श्री. ठोंबरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांचेसह विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.

जागतिक एड्स सप्ताहानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरु श्री. पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून या सप्ताहास सुरुवात करण्यात आली. एड्स प्रतिबंध व निमुर्लन व्हावे, याकरीता नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दिशा फाउंडेशनचे विनोद ढगे यांच्या चमूने पथनाट्य सादर केले. जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित प्रभातफेरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नर्सिंगच्या विद्यार्थीनी, गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी व इतर विविध महाविद्यालय, शाळांचे विद्यार्थी, सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

Protected Content