चंद्रशेखर अत्तरदेंचे खेडी ग्रामस्थांकडून स्वागत

3a1eee51 b2f8 48b6 89db c3841e30cca7

 

जळगाव (प्रतिनिधी) अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा आज खेडी गावात झंझावाती प्रचार दौरा मोठ्या उत्साहाने पार पडला. यावेळी गावातील महिलांनी चंद्रशेखर अत्तरदे व माधुरीताई अत्तरदे यांचे फुलहार घालून स्वागत केले.

 

यावेळी गावातील सर्व स्तरातून चंद्रशेखर अत्तरदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी गटातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. नागरिकांनी सदर प्रचार दौऱ्याला प्रतिसाद दिला. सदर दौरा माजी कृषि उत्पन्न बाजार समिति सभापति लकी टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आव्हाने-खेडी शिवरातील शक्ति प्रमुख चेतन सोनवणे, बूथ प्रमुख सचीन पाटील, भूषण पाटील, किरण सोनवणे, विशाल नन्नवरे, अनिल भागवत तसेच राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) आणि खेडी गावचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content