राजूमामांच्या सुपारी प्रकरणाची लिम्का बुकमध्ये नोंद करावी- अभिषेक पाटील

jalgaon news 1

जळगाव प्रतिनिधी । आमदार राजूमामा भोळे यांनी अधिकार्‍यांवर सुपारी घेतल्याचा केलेला आरोप हा अफलातून असून या घटनेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करावी असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिला आहे.

आमदार राजूमामा भोळे यांनी काही अधिकार्‍यांनी आपले करियर संपविण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोप केला होता. या पार्श्‍वभूमिवर, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार भोळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. याप्रसंगी ते म्हणाले की, आमदार महोदय यांनी अधिकार्‍यांनी माझी आमदारकी संपवण्यासठी सुपारी घेतले असल्याच आरोप केला. अधिकारी ते ही कनिष्ठ दर्जाचे मनपा अधिकारी यांनी आमदारकी संपविण्याची सुपारी घेणे ही कृती लिमका बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवावी लागेल अशी आहे. मात्र जनतेला कायमस्वरूपी मुर्ख बनविता येत नाही, हे आमदार महोदय विसरलेले दिसतात. स्वत:च्या नाकर्तेपणाचा ठपका, दोष अधिकार्‍यांवरून देऊन आमदार महोदय कर्तव्यातून पळ काळू इच्छित आहेत.

याप्रसंगी अभिषेक पाटील यांनी एक पत्रक जारी करून आमदार राजूमामा भोळे यांच्यावर आरोप केले आहेत. यात त्यांनी राजूमामांना विविध मुद्यांवरून आव्हाने दिली आहेत. हे पत्रक खालीलप्रमाणे आहे.

१) सन २०१४ मध्ये बाबा हरदासराम मंगल कार्यालयात मनपाचे गाळे मालकी हक्काने नावावर करून देईन असा वायदा राजुमामा यांनी केला होता. त्यानंतर शहरात त्यांच्यासह त्यांच्याच पक्षाचे एकुण तीन आमदार असतांना, त्यांच्याच पक्षाचे खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री व राज्य सरकार असतांना आजपर्यंत गाळेधारकांची ससेहोलपट संपुष्टात आलेली नाही – ही सुपारी कुठल्या अधिकार्‍यांने घेतली हे आमदार भोळे यांनी जाहिर करावे.

२) समांतर रस्त्याअभावी शेकडो निरपराध नागरीकांचे बळी जात आहेत. आमदार भोळे यांच्याच पक्षाचे राज्य सरकार व केंद्र सरकार असतांना व त्यांच्याच पक्षाचे खासदार गेल्या ११ वर्षापासून असतांना समांतर रस्ते हा प्रश्‍न आमदार भोळे यांनी सोडविलेला नाही – ही सुपारी कुठल्या अधिकार्‍यांने घेतली हे आमदार भोळे यांनी जाहीर करावे.

३) जळगाव मनपातील नगररचना विभागत नागरीकांना भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी लाखांच्या घरात रक्कम मोजावी लागते. आमदारांच्या पत्नी स्वत: महापौर असतांना सर्रास हा प्रकार नगररचना विभागात सुरू होता. – ही सुपारी कुठल्या अधिकार्‍यांने घेतली हे आमदार भोळे यांनी जाहिर करावे.

४) रस्त्यावरील अतिक्रमणे यांना अभय देऊन मात्र वर्षानुवर्षे रीतसर व्यवसाय करून पोट भरणार्‍या कोर्टाच्या भिंतीजवळील पक्की दुकानांवर हातोडा चालविण्यात आला व त्यांना बेरोजगार करण्यात आले. शहराचे आमदार व महापौर एकाच घरातील असतांना – ही सुपारी कुठल्या अधिकार्‍यांने घेतली हे आमदार भोळे यांनी जाहिर करावे.

५) गाळेधारकांचे थकीत बिलातील भाडे रक्कम कमी करून आणतो या नावाखाली पदाधिकार्‍यांच्या एका मित्राने कोट्यावधी रूपयांचा मलीदा खाल्ला – ही सुपारी कुठल्या अधिकार्‍यांने घेतली हे आमदार भोळे यांनी जाहिर करावे.

६) शहराच्या स्वच्छतेचा ठेका पुर्वीपेक्षा दुप्पट दराने व अत्यंत वादग्रस्त एजन्सीला देण्यात आला – ही सुपारी कुठल्या अधिकार्‍यांने घेतली हे आमदार भोळे यांनी जाहिर करावे.

७) जळगांव शहरात सध्या सुरू असलेल्या अमृत योजनेच्या निविदेमध्ये खराब केलेल्या रस्त्यांची परत सुधारणा करावी म्हणून त्यासाठी वेगळा रू. ३० कोटी चा निधी मंजूर आहे तरी महानगरपालीका मधील अधिकारी तसेच आमदार या निधीचा वापर का करीत नाही आहे? – ही सुपारी कुठल्या अधिकार्‍यांने घेतली हे आमदार भोळे यांनी जाहिर करावे.

वर सांगीतलेल्या एकाही कामकाजाशी आमदार भोळे यांनी आरोपीत केलेल्या भोळे व खडके या अधिकार्‍यांचा संबंध येत नाही. मुळात आमदार भोळे स्वत:च्या अकार्यक्षमतेचा दोष अधिकार्‍यांवर लादून जनतेला मुर्ख बनवू पाहत आहे. त्यांच्याच पक्षाचे राक्षसी बहुमत मनपात असतांना व त्यांच्याच पत्नी गेल्या १५ महिन्यांपासून महापौर पदावर असतांना त्यांनी सहाय्यक आयुक्त, शहर अभियंता, प्रभाग अधिकारी हे पदे शासन नियुक्त अधिकारी का नेमले नाहीत.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, आमदार भोळे यांनी केलेल्या कथित आरोपानुसार अधिकार्‍यांनी अशा प्रकारे गैरकृत्याची सुपारी घेतली असल्यास सदर प्रकार भारतीय दंड विधान कायद्यानुसार गुन्हेगारी कृत्य ठरते. आपल्या बोलण्यात सतत्या असल्यास आमदार राजुमामा भोळे यांनी संबंधित अधिकार्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल करावा किंवा तेवढीही कुवत नसल्यास पुरावे व कागदपत्र आमच्याकडे द्यावीत. आम्ही शहराच्या केवीलवाण्या आमदारास गुन्हेगार अधिकार्‍यांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करू म्हणजे ङ्गङ्घदुध का दुध और पानी का पानीफफ होऊ जाईल.

Protected Content