…शपा, जपा आणि उठा असे उल्लेख चालतील का ? : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर । माझ्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा होतो, तर शरद पवार, जयंत पाटील व उध्दव ठाकरे यांना शपा, जपा आणि उठा असे म्हटलेले चालेल का ? असा सवाल आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीनं कधीही टरबुज्या म्हटलं नाही, इतर कुणीही म्हटलेलं मी ऐकलं नाही, परंतु चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा असा होतो, म्हणून त्यांनी या गोष्टीचा राग मानू नये असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला होता. आज कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझ्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा होतो, म्हणून चंपा बोलणं अयोग्य आहे. उद्या जयंत पाटील यांचा जपा, शरद पवारांचा शपा किंवा उद्धव ठाकरेंचा उठा असा उल्लेख व्हायला लागला, तर ते सुसंस्कृत राजकारणात बसणारं नाही, त्यामुळे असे प्रकार टाळले पाहिजेत अशी अपेक्षा चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली.

Protected Content