जिल्ह्यातील सिंचन कामांना मिळणार गती

uddhav thackera 11

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्प, पद्मालय सिंचन प्रकल्प, बलून बंधारे, शेळगाव बॅरेज, वरखेड लोंढे प्रकल्पाची कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ते नाशिक येथील आढावा बैठकीत बोलत होते.

नाशिक येथे विभागाची पहिलीच आढावा बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरूवारी झाली. यात जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील प्रश्‍नांमध्ये अंजनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचा अभ्यास करून अहवाल सादर करा. जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून चाळीसगाव येथील कत्तलखान्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच जळगाव जिल्ह्यातील नम्न तापी प्रकल्प, पद्मालय सिंचन प्रकल्प, बलून बंधारे, शेळगाव बॅरेज, वरखेड लोंढे प्रकल्पाची कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.

Protected Content