Home आरोग्य राष्ट्रीय हिवताप दिनानिमित्त भादली येथे जनजागृती अभियान

राष्ट्रीय हिवताप दिनानिमित्त भादली येथे जनजागृती अभियान

0
221


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय हिवताप दिनानिमित्त मौजे भादली येथे आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात ज्वर, डेंग्यू, चिकुनगुनिया व हिवताप सदृश आजारांबाबत लक्षणे, उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. तोहेर तडवी आणि डॉ. अंजली पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत या आजारांची प्रारंभिक लक्षणे ओळखण्याचे महत्त्व स्पष्ट केले. वेळेत निदान व उपचार न झाल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांबाबतही त्यांनी जनतेला माहिती दिली. तसेच घरगुती स्तरावर स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे आणि डासांची उत्पत्ती रोखणे यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान आरोग्य विभागाच्या पथकाने गावात प्रत्यक्ष जाऊन कंटेनर सर्व्हेक्षण मोहीम राबविली. आरोग्य सहाय्यक महेंद्र भिमराज वानखेडे, दिलीप ठाकुर तसेच आरोग्य सेवक अल्ताफ देशपांडे यांनी घराघरात जाऊन पाण्याच्या साठवणुकीच्या ठिकाणांची तपासणी केली. संभाव्य डास उत्पत्ती ठिकाणे ओळखून ती नष्ट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

यावेळी आशा वर्कर वनिता कोळी, वर्षा कोळी, योगिता वारके आणि दिपाली पाचपांडे यांनीही सक्रिय सहभाग घेत दुर्गम भागातील पाण्याचे कंटेनर रिकामे करून स्वच्छतेस हातभार लावला. त्यांच्या या सहभागामुळे गावात डासजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी जनजागृती निर्माण झाली.


Protected Content

Play sound