दारूबंदी कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यातील दोन जणांवर स्थानबद्धतेची कारवाई; जिल्हाधिकारी यांचे आदेश

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या दादाराव रामदास जोगी (वय-४४, भागदरा, जामनेर) व भिवा बाबूलाल गायकवाड (वय-४८, मेहुणबारे, ता.चाळीसगाव) या दोन जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करत स्थानबद्ध करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता काढले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, गुन्हेगार भिवा गायकवाड याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत सहा तर दादाराव जोगी याच्याविरुद्ध १० गुन्हे दाखल आहे. त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी स्थानबद्धतीच्या कारवाईसाठी हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष्यप्रसाद यांच्याकडे पाठवण्यात आला होता
प्रस्तावाला जिल्हाधिकार्‍यांनी शनिवारी 30 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता गुन्हेगार दादाराव जोगी याला येरवडा तर भिवा गायकवाड याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, रमेश घडवजे, शामकांत सोनवणे, युनूस शेख इब्राहिम, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील पंडित दामोदरे, जयंत चौधरी, रफीक शेख काळू, दीपक नरवाडे, गोरख चकोर, जितू परदेशी, सुदर्शन घुले, ईश्वर देशमुख आदींच्या पथकाने केली.

Protected Content