नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल संघाची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या हॉलीबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा हॉलीबॉल संघाची निवड शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात करण्यात आली.

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व नाशिक जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे ११ नोव्हेंबर रोजी विभागीय युथ २१ वर्षा आतील व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जळगा जिल्हा हॉलीबॉल संघ देखील सहभाग घेणार आहे. या अनुषंगाने शहरातील नुतन मराठा महाविद्यालयातील मैदानात निवड चाचणी घेण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यातील ३५ मुलांनी सहभाग नोंदविला. त्यातून जळगाव जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. व्हॉलीबॉल संघाचे अध्यक्ष फारूख शेख, सचिव अंजली पाटील, इफ्तेखार शेख यांनी संघाची घोषणा केली. निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबीर ७ ते १० नोव्हेंबर पर्यंत घेण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या संघात  ऋग्वेद इंगळे, केतन पाटील, विवेक बनाईत, चिरायू बागुल, यश जंजाळे, हर्षद भोसले, ओम गुरव, साहिल महाजन, तनवीर शेख, मोमीन तडवी आणि हर्षल मिस्त्री यांचा समावेश आहे. निवड चाचणीत संघटनेचे राज्यस्तरीय पंच दर्शन आटोळे, धनंजय आटोळे, निलेश चौधरी यांनी सहभाग घेतला.

Protected Content