ठरलं : जिल्हा बँकेची निवडणूक वेळेतच होणार !

जळगाव राहूल शिरसाळे | राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाने आज जिल्हा बँकाच्या निवडणुका वेळेवरच घेण्याचे निर्देश जारी केल्यामुळे आता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लांबणीवर न पडता वेळेवर घेण्यात येईल असे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

राज्य सरकारला कोरोनाचे कारण देऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याचा महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने सोडवून निवडणुका घेण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे. या अनुषंगाने आजच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणारी यंत्रणा असणार्‍या राज्य सहकार निवडणूक प्राधीकरणाने जिल्हा बँकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश आज जारी केले आहेत.

प्राधिकरणाने डिसेंबर २०२० पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या https://livetrends.news सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच येत्या २० सप्टेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. यामध्ये गृहनिर्माण संस्थांचा समावेश नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्था सोडून इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यासाठी मतदारांच्या याद्या तयार करुन सहा महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्राधिकरणाने सांगितले आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे https://livetrends.news जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जेडीसीसीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. यामुळे आता जळगाव जिल्हा सहकार क्षेत्रातील घडामोडींना वेग येणार असल्याचे दिसून येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!