शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम तातडीने करा : जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगरला जाणार्‍या रेल्वेवरील उड्डाणपुलाचे काम संथ गतीने होत असल्याच्या तक्रारीनंतर आज जिल्हाधिकार्‍यांनी याचे काम तातडीने करण्याचे निर्देश दिले.

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी शिवाजीनगर पुलाच्या कामला विलंब होत असून याचा सेवा रस्ता मोकळा करण्यात आला नसल्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या कामाची पाहणी केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासोबत आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा, कंत्राटदार आदित्य खटोड, दीपककुमार गुप्ता आदी मान्यवर होते. याप्रसंगी जिल्हाधिकार्‍यांनी कंत्राटदाराशी चर्चा करून हे काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.