जळगाव तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । गोपाळपुरा भागात २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नितीन प्रदीप सोनवणे (वय २३, रा. गोपाळपुरा, पाण्याच्या टाकीजवळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटंुबीयांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निता भोळे यांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. नितीन याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी डॉ. भोळे यांनी दिलेल्या खबरीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज इंद्रेकर तपास करीत आहेत.

Protected Content