Home Cities अमळनेर मुलाला वाचवताना बापानेही गमावला जीव; तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू !

मुलाला वाचवताना बापानेही गमावला जीव; तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू !

0
145


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडणाऱ्या लेकाला वाचवतांना बापासकट मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील खौशी गावात आण्णा तलवारे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांना विरेंद्र हा दहा वर्षांचा मुलगा देखील होता. खौशी येथील तलावात तो गेला असतांना पाण्यात पडून बुडू लागला. मुलाला बुडताना पाहून त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तलावात धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडाले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खवशीसह परिसरात शोककळा पसरली. मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही जीव गेल्याने या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound