Home Cities अमळनेर विजय लिफ्ट सोसायटीच्या जिल्हा बँक प्रतिनिधीपदी जितेंद्र पाटील बिनविरोध 

विजय लिफ्ट सोसायटीच्या जिल्हा बँक प्रतिनिधीपदी जितेंद्र पाटील बिनविरोध 

0
8


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विजय लिफ्ट सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे संचालक तथा ‘पिंटू राजपूत’ म्हणून परिचित असलेले जितेंद्र प्रेमसिंग पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विजय लिफ्टच्या कार्यक्षेत्रातील चारही गावांमधील सभासदांनी एकमताने ठराव मंजूर करून त्यांच्या नावाला संमती दिल्याने त्यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.

विजय लिफ्ट सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यक्षेत्रातील चारही गावांमधील सभासदांनी एकत्रितपणे ठराव करून जितेंद्र पाटील यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदासाठी त्यांची निवड बिनविरोध झाली. शेतकरी, पाणीपुरवठा आणि समाजहिताच्या विविध कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याची पावती म्हणून या निवडीकडे पाहिले जात आहे. जितेंद्र पाटील हे विजय लिफ्ट सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. परिसरातील शेतकऱ्यांशी त्यांचा सातत्याने संपर्क राहिला असून, संस्थेच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांच्या प्रश्नांवर काम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे प्रतिनिधीपदासाठी त्यांच्या नावाला चारही गावांमधून एकमताने पसंती मिळाल्याचे सांगण्यात आले. यावेळी विजय लिफ्ट सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन युवराज पाटील (बोहरा), व्हॉइस चेअरमन निंबा पाटील (मारवड), संचालक अरुण विंचूकर (बोहरा), शिवाजी पाटील (बोहरा), सुनील अहिरराव (बोहरा), आनंदराव मुंदडा (मारवड), काशिनाथ पाटील (गोवर्धन), पंडित पाटील (पाडळसरे), सत्यभामाबाई पाटील (गोवर्धन), देवकाबाई चौधरी (कळमसरे), दिलीप पाटील (मारवड), विवेक विंचूरकर (बोहरा) आणि आसाराम धनगर (बोहरा) यांच्यासह सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थित सभासदांनी जितेंद्र पाटील यांच्या नावाला एकमताने संमती देत ठराव मंजूर केला. बिनविरोध निवडीमुळे संस्थेतील सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जितेंद्र पाटील यांच्या बिनविरोध निवडीबद्दल माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष तथा सात्रीचे माजी सरपंच महेंद्र बोरसे, कळमसरे ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. चारही गावांतील सभासदांनी एकमताने ठराव मंजूर करून जितेंद्र पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी बिनविरोध निवड केली आहे. शेतकरी व समाजहिताच्या कार्यावर सभासदांनी दाखविलेला विश्वास म्हणून या निवडीकडे पाहिले जात असून, त्यांच्या निवडीमुळे सहकार क्षेत्रातील जबाबदारीही वाढली आहे.


Protected Content

Play sound