विविध नामांकित कंपनीद्वारा विद्यापीठातील पाच विद्यार्थ्यांची ‍निवड

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षातंर्गत विविध नामांकित कंपनीद्वारा घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिसर मुलाखतीद्वारे पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

युनिर्व्हसिटी इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थ्यांसाठी अदानी विल्मर लि., अहमदाबाद , बॉस चाकन, पुणे, रॅलीज इंडिया लि. मुंबई, व्हीजन प्रोडॅक्ट प्रा. लि., वडोदरा व हिंदुस्थान स्पेशालिटी केमिकल लि. मुंबई या नामांकित कंपन्यातर्फे बी.टेक. ऑईल टेक व प्लास्टीक, केमीकल इंजिनिअरींग या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परिसर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. यात पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

प्रणय काठवते, अनिल अस्वर, सिध्दांत सिंग, दीपक पाटील, विनायक राय या निवड झालेल्या विद्यार्थ्याचे प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, प्र. कुलसचिव प्रा. आर.एल. शिंदे, केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक डॉ. भूषण चौधरी, युआयसीटीचे संचालक प्रा.जे.बी.नाईक प्रा.यु.डी.पाटील तसेच प्लेसमेंट अधिकारी सोनाली दायमा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Protected Content