प्रजासत्ताक दिनी’ राजपथावर शेंदूर्णीची ऐश्वर्या साने करणार कथक नृत्याचं सादरीकरण

शेंदूर्णी प्रतिनिधी | प्रजासत्ताक दिनी ‘दिल्ली’ येथे राजपथावर होणाऱ्या संचलनात यावर्षी प्रथमच भारतीय शास्त्रीय नृत्याचा कथ्थकचा समावेश करण्यात आला असून यात शेंदूर्णी येथील ऐश्वर्या साने आपल्या ग्रुपबरोबर कथ्थक नृत्य करणार आहे.

येथील स्व.डॉ.चारुदत साने व डॉ.कौमुदी साने यांची मुलगी ऐश्वर्या साने हिने ‘कथ्थक’ या हिंदूस्थानी शास्त्रीय नृत्याची पदवी संपादन केली आहे. पंधरा वर्षे परिश्रम करून गुरु तेजस्विनी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ती घडली असून अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवत यशस्वी होत आहे. नृत्याच्या माध्यमातून भारतासह परदेशातही कार्यक्रमाद्वारे ती आपल्या नृत्याची छाप पाडत आहे .

दि. २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनी ‘दिल्ली’ येथे राजपथावर होणाऱ्या संचलनात यावर्षी प्रथमच भारतीय शास्त्रीय नृत्याचा कथ्थकचा समावेश करण्यात आला असून यात ती आपल्या ग्रुपबरोबर कथ्थक नृत्य करणार आहे.

यावेळी भारताचे माननिय राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच देश विदेशातील मान्यवरांची उपस्थिती असेल. या संचलनातील सांस्कृतिक कार्यक्रम निवडीसाठी २ चाचणी फेऱ्या मुंबई आणि दिल्ली येथे झाल्या. तिथे गुरु तेजस्विनी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी ऐश्वर्याच्या ग्रुपने कथ्थक नृत्य सादर केलं व त्यांची निवड झाली व ‘वंदे भारतीयम’ या कार्यक्रमांतर्गत १०.३० ते १२.३० या वेळेत त्यांचे नृत्य सादर होईल

Protected Content