अजाण सुरु असताना गाणे लावले; रेल्वे पोलीसच गुन्ह्यात अडकले.

मुंब– लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजाण सुरु असताना स्पीकरवर गाणं लावल्यानं रेल्वे पोलीसावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली आहे.

औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाण्यात चिथावणीखोर कृती केल्याचा ठपका ठेवत किशोर गडप्पा मल्कूनाईक या रेल्वे पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, औरंगाबादच्या सातारा परिसरामध्ये किशोर मल्कू नाईक राहतात. त्या ठिकाणापासून रस्त्याच्या पलीकडे एक मस्जित आहे. त्या ठिकाणी अजाण सुरु असताना स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी वाजवली. याठिकाणी जमाव एकत्र आला. पोलीसांना बोलविण्यात आलं आणि दोन समजात तेढ निर्माण होईल. अशी कृती केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content