Home क्राईम कांचन नगरातील प्रशांत चौकात जुगार अड्ड्यावर पोलीसांची कारवाई

कांचन नगरातील प्रशांत चौकात जुगार अड्ड्यावर पोलीसांची कारवाई


जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचन नगर भागातील प्रशांत चौकात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरशनीपेठ पोलीसांनी छापा टाकून ६ हजार २८० रूपयांच्या रोकड हस्तगत करून आठ जणांवर शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन नगर भागात असलेल्या प्रशांत चौकात काही व्यक्ती बेकायदेशीर जुगार खेळत असल्याची माहिती शनीपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पोलीसांनी प्रशांत नगरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. विवेक उर्फ भैय्य मधुसुदन सपकाळे, गजानन वसंत चंदनकर, रोशन आप्पा उर्फ प्रभाकर पाटील, सागर भिवलाल कोळी, पंकज सुपडू मोहासे, नामदेव सुकदेव माळी, हितेश संजय निंबाळकर आणि जयेश शरद मराठे सर्व रा. प्रशांत चौक कांचननगर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजळून ६ हजार २८० रूपयांची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्या हस्तगत केले आहे. पो.कॉ. राहूल पाटील यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरात शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल कावडे, पोहेकॉ रविंद्र पाटील, अनिल कांबळे, पो.ना. अमित बाविस्कर, पोकॉ राहूल पाटील यांनी कारवाई केली.


Protected Content

Play sound