चौगावात उद्या साजरा होणार वृक्षांचा वाढदिवस 

pachora 3

चोपडा, प्रतिनिधी | चौगाव येथील श्री क्षेत्र त्रिवेणी मंदिर व विजयगड परीसरात मागील वर्षी  निसर्ग मित्र समिती व वन विभागाच्या संयुक्त विद्यमानाने उद्या (दि.२८) यापूर्वीच लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच शिव छत्रपती परीवारा मार्फत विजयगडावर किल्ला संवर्धन  करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज विशाल राजे भोसले उपस्थीत राहाणार आहेत. त्याचप्रमाणे वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, उपवन संरक्षक पी.टी.मोरणकर, सहाय्यक उपवन संरक्षक व्ही.एच.पवार, चोपडा पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, पं.स.सदस्या प्रतिभा पाटील, कृषी विस्तार अधिकारी सतिश कोळी, वनक्षेत्रपाल पी.बी. पाटील, दुर्गवीर संस्थानचे राहूल पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व निसर्ग मित्र समिती सदस्य यावेळी उपस्थीत राहणार आहेत.

Protected Content