खडसे महाविद्यालयात बॉल बॅडमिंटन कार्यशाळेला प्रारंभ       

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथे बॉल बॅडमिंटन प्रशिक्षण कार्यशाळेची उत्साहात सुरुवात झाली आहे.

दिनांक 16 सप्टेंबर गुरुवारपासून ते 20 सप्टेंबर 2022 पर्यंत पाच दिवसीय बॉल बॅडमिंटन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेच्या मैदानाचे उद्घाटन प्रा.एस. एम. पाटील यांच्या हस्ते मैदान व साहित्याचे पूजन करून करण्यात आले.

याप्रसंगी आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रा.एस .एम.पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना खेळासोबतच अभ्यासाकडेही लक्ष देऊन, स्पर्धेचे युग असल्यामुळे खूप सराव करण्यासाठी अथक परिश्रमाची साथ किती महत्त्वाची आहे हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.

या बॉल बॅडमिंटन खेळाचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्य शिकण्यासाठी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू पंकज खिरोळकर याची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन मा. प्र. प्राचार्य डॉ .एच .ए. महाजन व उपप्राचार्य डॉ. ए .पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ प्रतिभा ढाके (क्रीडा संचलिका) व क्रीडा समिती सदस्य यांनी केले.

याप्रसंगी प्रबोध बोदडे, राहुल बोदडे, अनुराज बोदडे, गितेश कात्रे, तेजस झांबरे, सुहास जाधव, नेहा जोहरे, सौरभ शेवाळे ,चेतन माळी, पवन सुतार, जयेश पाटील, हितेश माळी, मराठे व इतर खेळाडू कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Protected Content