नुकसानग्रस्त भागात कृषीमंत्र्यांकडून पाहणी

चाळीसगाव, प्रतिनिधी  । तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. याची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे हे शनिवार रोजी चाळीसगाव दौऱ्यावर होते. त्यांनी तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, खेर्डे तसेच इतर ठिकाणी पाहणी करून पंचणामे जलदगतीने करण्याचे निर्देश दिले.

 

चाळीसगाव तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी रात्री अचानक ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे अनेक जणांचे  जणावरे व घरे वाहून गेली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीने क्षणार्धात होतेचं नव्हतं केलं. या संकटामुळे असंख्य जणांचे जगणे असाह्य झाले. दरम्यान, अतिवृष्टीचा जबर तडाखा हे तालुक्यातील वाघडू, वाकडी, खेर्डे आदी गावांना बसला आहे. शंभर टक्के नुकसान झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पाहणीसाठी मंत्र्यांचे दौरे हे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शनिवार रोजी नुकसानग्रस्त भागात आमदार मंगेश चव्हाण व आमदार किशोर अप्पा पाटील यांच्यासह त्यांनी तालुक्यातील वाघडू, वाकडी, रोकडे, खेर्डे तसेच इतर नुकसान भागात पाहणी केली. पाहणी दरम्यान कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पंचणामे हे जलदगतीने करण्याचे निर्देशन दिले. त्याचबरोबर नदीकाठच्या नागरिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून तातडीने मदत जाहीर करण्यात येईल असे सुतोवाच ही त्यांनी केले.

 

Protected Content