यावल एसटी महामंडळाच्या जागेवर साफसफाई व्हावी शिवसेना (उबाठा) ची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील एस टी आगारास लागुन असलेल्या महामंडळाच्या राखीव पडीत भुखंडावर संपुर्ण परिसरात सर्वत्र काटेरी झाडे व घाणीचे साम्राज्य पसरले असुन या ठीकाणी जंगला सारखे वातावरण निर्माण झाल्याने या भुखंडाच्या आजुबाजुच्या रहीवाशी वस्ती मधील नागरीकांच्या आरोग्यास व जिवितास धोका निर्माण झाले असुन महामंडळाने त्वरीत या जागेवर साफसफाई करावी तात्काळ या निवेदनाची दखल न घेतल्यास शिवसेनाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी शिवसेना ( उबाठा ) च्या वतीने करण्यात आली आहे .

या संदर्भात शिवसेना ( उबाठा ) ने यावल आगार व्यवस्थापक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , यावल एसटी आगाराच्या बस स्थानकाला लागुन महामंडळा मोठे भुखंड असुन, या भुखंडाची मागील १५ते २० वर्षापासुन साफसफाई झाली नसल्याने या जागेवर जंगला प्रमाणे मोठमोठी काटेरी झाडे व दुर्गंधीचे वातावरण तयार झाले असुन, त्यामुळे या जागेवर नको ते जिव साप, जनावर , किडे, डास आदी मानवी जिवनास व आरोग्यास धोका निर्माण करणारी निर्माण झाली असुन,ही जनावरे या भुखंडावरील जागेला संरक्षण भिंत बांधलेली नसल्याकारणाने या जागेला लागुन असलेल्या वस्तीमध्ये ही जिव जनावरे नागरीकांच्या घरात प्रवेश करीत असुन परिसरात राहणाऱ्या नागरीकांमध्ये जिवीतास धोका निर्माण झाला असुन रहीवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . तरी एसटी महामंडळाने या खुल्या भुखंडाच्या जागेवर तात्काळ साफसाफई करून जागेच्या चारही बाजुस संरक्षण भिंत बांधावी अन्यथा शिवसेना ( उबाठा ) च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या जिवितास काही बरेवाईट झाल्यास यास संपुर्णपणे आपले एसटी महामंडळ जबाबदार राहील अशी मागणी यावल शिवसेना ( उबाठा ) च्या वतीने करण्यात आली आहे . यावेळी यावल एसटी आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विजय पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनावर शिवसेना( उबाठा)चे यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले शहर उपप्रमुख संतोष धोबी, योगेश चौधरी , तालुका संघटक पप्पु जोशी,आदीवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसैन तडवी ,यावल शहर संघटक सुनिल बारी,युवा सेनेचे शहर अधिकारी सागर देवांग ,पिन्टू कुंभार , शाखा प्रमुख निलेश पाराशर आदींच्या स्वाक्षरी आहे .

Protected Content