न्हावी येथे जुगार अड्ड्यावर धाड; पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त

crime 7

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील न्हावी येथे दुर्गा उत्सव मंडळाच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत नऊ जुगारींना अटक केली ही कारवाई 3 ऑक्टोबरच्या रात्री करण्यात आली.

फैजपूर डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीवरून सपोनि प्रकाश वानखेडे कॉन्स्टेबल देविदास सूरदास , राजेश भराटे, व महेंद्र महाजन यांच्या पथकाने न्हावी येथील वाणी वाड्यातील दुर्गा उत्सव मंडळाच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड घातली या धाडीत सहा हजार पन्नास रुपये रोख व 8400 रुपयाचे मोबाईल असा एकूण 14 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. यावेळी जहांगीर इस्‍माईल तडवी, दीपक हिरामण भोई, निलेश प्रकाश काकडे, चेतन समाधान कोळी, आकाश धनसिंग पाटील, प्रदीप उमेश सोनी, सतीश एकनाथ धनगर, दिनेश सुरेश कोळी, गोपाळ पुंडलिक बाविस्कर सर्व राहणार न्हावी यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. याप्रकरणी महेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास देविदास सूरदास करीत आहे.

Protected Content